Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत एक कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने खारघरमधील एका रो हाऊसवर छापा टाकत तब्बल एक कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये

लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता
रस्‍त्‍यावरील पाण्यातून मार्ग काढताना गेला तोल
नगरमधील कोविड रुग्णसंख्या लागली घटू ; रोजचा सातशेचा आकडा आला अडीचशेवर, लॉकडाऊनचा परिणाम

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने खारघरमधील एका रो हाऊसवर छापा टाकत तब्बल एक कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या अमली पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली असून यात 10 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.
खारघरमधील एका रो हाऊसमध्ये अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित रो हाऊसवर छापा टाकत एक कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 16 नायजेरीयन व्यक्तींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपींची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS