Homeताज्या बातम्यादेश

जीएसटी महसूल डिसेंबरमध्ये 1.5 लाख कोटींवर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यांपासून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची प्रचंड वसुली होतांना दिसून येत आहे. जीएसटी महसूल डिसेंबर 2022 मध

सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यांपासून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची प्रचंड वसुली होतांना दिसून येत आहे. जीएसटी महसूल डिसेंबर 2022 मध्ये सुमारे 1.5 लाख कोटींवर पोहोचला . नोव्हेंबरच्या संकलनापेक्षा 2.5 टक्के आणि डिसेंबर 2021 च्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त आहे. वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8 टक्के जास्त होता, तर देशांतर्गत व्यवहारातील महसूल (सेवांच्या आयातीसह) डिसेंबर 2021 मध्ये मिळालेल्या महसुलापेक्षा 18 टक्के जास्त होता. हा सलग दहावा महिना आहे, की जीएसटी संकलनाने 1.4 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये गोळा केलेला एकूण जीएसटी महसूल 1,49,507 कोटी आहे. ज्यामध्ये सीजीएसटी 26,711 कोटी, एसजीएसटी 33,357 कोटी, आयजीएसटी 78,434 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 40,263 कोटींसह) आणि 10,100 कोटी रुपयांचा (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 850 कोटींसह समावेश असल्याचे अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत महसुलात 2.5% वाढ झाली असताना, व्युत्पन्न झालेल्या ई-वे बिलांची संख्या डिसेंबरमध्ये 3.95 टक्के वाढून 7.9 कोटींवर गेली आहे. देशांतर्गत व्यवहारांतून मिळणार्‍या उत्पन्नात एकूण 18 टक्के वाढ झाली. तर डझनभर राज्यांनी कर संकलनात उच्च वाढ नोंदवली आणि 13 राज्यांनी मंद विकास दर नोंदवला. गोवा, ओडिशा आणि मणिपूर यांनी अनुक्रमे 22 टक्के, 6 टक्के आणि 5 टक्के महसुलात घट नोंदवली आहे.

COMMENTS