Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायरान जमीन घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सवाप्रकरणी 15 कोटी वसुलीचे टार्गेट

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायरान जमीन घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सवाप्रकरणी 15 कोटी वसुलीचे टार्गेट प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका होत असून, हिवाळी अधिवेशनात तर, थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र यावर बोलतांना कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, स्वपक्षातील अर्थात शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदे न मिळाल्यामुळे त्यांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

कथीत टीईटी घोटाळा प्रकरण मी मंत्री असतानाचे बाहेर का आले? तर या प्रकरणात मी पंचवीस पैशाचाही फायदा घेतलेला नाही. यासाठीच्या कागदाची किंमत पगार नाहीतर नोकरीसाठी असते. आम्ही यामध्ये कसलाच घोटाळा केला नाही असा रिपोर्ट आयुक्तांनी दिला, जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांनीही दिला. यापेक्षा आता काय प्रुफ पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील. असा आरोप सत्तार यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचे सांगितले. मी कोणाचेही नाव घेतले नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे. विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतके महत्वपूर्ण खाते कसे दिले याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद असल्याचा आरोप देखील सत्तार यांनी यावेळी केला.

शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी – कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळले असून यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल, असं अब्दुल सत्तार विरोधकांना उद्धेशून म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत. मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटले आहे. जोपर्यंत देव माझ्यासह आहे तोपर्यंत काही होणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान त्यांच्याविरोधातील कटात कोण सहभागी आहे असे विचारलं असता ते म्हणाले आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचे सांगत नाराजी जाहीर केली.

COMMENTS