काही शिजतयं की केवळ चर्चाच!

Homeसंपादकीयदखल

काही शिजतयं की केवळ चर्चाच!

उध्दव ठाकरे-नरेंद्र मोदी यांची भेट,पाठोपाठ मुंबईत शरद पवार- उध्दव ठाकरे,१५ जुलैला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस ,१६ जुलैला नरेंदर मोदी फडणवीस,फडणवीस शरद

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वाजले सूप ; लोकसभा मुदतीआधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित
पेगासस प्रकरणातील आरोप बिनबुडाचे- केंद्र सरकार
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN

उध्दव ठाकरे-नरेंद्र मोदी यांची भेट,पाठोपाठ मुंबईत शरद पवार- उध्दव ठाकरे,१५ जुलैला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस ,१६ जुलैला नरेंदर मोदी फडणवीस,फडणवीस शरद पवार,राजनाथसिंग शरद पवार आणि १७ जुलैला नरेंद्र मोदी -शरद पवार अशा भेटीगाठींच्या प्रपंचानंतर महाराष्ट्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.या चर्चेचा रोख अर्थातच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य आणि विविध राजकीय नेत्यांवर सुरू असलेली इडीची कारवाई अशा मुद्यांभोवती पिंगा घालीत आहे.तथापी यापलिकडेही या भेटींचा अर्थ असू शकतो,यातून काही अनर्थही पाझरू शकतात आणि अनपेक्षित अन्वयार्थही दिसू शकतात.या भेटींतील शरद पवार आणि नरेंद्र मोदी हा कॉमन फँक्टर लक्षात घेता जिथे आपल्या सारख्या सामान्य माणसाची वैचारिक क्षमता संपते तिथून या मडळीचा विचार सुरू होतो.म्हणूनच भारताच्या विद्यमान राजकारणातील या दोन बिग पॉलिटिकल ग्म्बलर मध्ये झालेल्या भेटीचा अर्थ एव्हढ्या सहजा सहजी काढणे घाईचे ठरू शकते…

राजकारणात कुणी कुणाचे सदा सर्वकाळ शत्रू किंवा मित्र नसतो,परिस्थितीनुरूप राजकारणात भुमिका बदलणारे नेते भारतीय लोकशाहीला नवीन नाहीत.निष्ठा केवळ कार्यकर्त्यांनी जपायच्या असतात नेत्यांना निष्ठेचे सोहळे नसते,अशा या राजकारणात पक्षापलीकडचे हितसंबंधही जपण्यात अनेकांचा हातखंडा असतो.सर्व पक्षात असलेले मैत्रीपुर्ण संबंध,अजात शत्रू अशा नानाविध विशेषणांचे अलंकार लेवून राजकारण करणारी मंडळी अधूनमधून एकमेकांच्या सानिध्यात ,सहवासात नेहमी असतात.अधूनमधून भेटीगाठी होत असतात.अशा भेटीगाठींमध्ये वेगळे काही असते असे प्रत्येकवेळी मानण्यात हशील नसले तरी अशा भेटी कुठल्या वातावरणात झाल्या हे देखील महत्वाचे ठरते.विशिष्ट काळात,तत्कालीन परिस्थितीचा वेध घेऊन झालेल्या भेटीतून नेमके साध्य करण्याचा उद्देशही तेव्हढाच महत्वाचा ठरतो.अशा काही भेटीं तत्कालीन राजकारणाशी पडताळून पाहिल्या जातात.सध्या अशा काही भेटींवर भारतीय विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होतांना दिसते आहे.विशेषतः जुलै महिन्याचे गेले पंधरा दिवस अशा भेटींच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.नरेंद्र मोदी,शरद पवार उध्दव ठाकरे,देवेंद्र फडणवीस ,छगन भुजबळ आदी मध्ये वेगवेगळ्या संदर्भाने झालेल्या भेटी राजकीय वावड्यांना प्रेरणा देत आहेत. उध्दव ठाकरे-नरेंद्र मोदी यांची भेट,पाठोपाठ मुंबईत शरद पवार- उध्दव ठाकरे,१५ जुलैला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस ,१६ जुलैला नरेंदर मोदी फडणवीस,फडणवीस शरद पवार,राजनाथसिंग शरद पवार आणि १७ जुलैला नरेंद्र मोदी -शरद पवार अशा भेटीगाठींच्या प्रपंचानंतर महाराष्ट्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.या चर्चेचा रोख अर्थातच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य आणि विविध राजकीय नेत्यांवर सुरू असलेली इडीची कारवाई अशा मुद्यांभोवती पिंगा घालीत आहे.तथापी यापलिकडेही या भेटींचा अर्थ असू शकतो,यातून काही अनर्थही पाझरू शकतात आणि अनपेक्षित अन्वयार्थही दिसू शकतात.या भेटींतील शरद पवार आणि नरेंद्र मोदी हा कॉमन फँक्टर लक्षात घेता जिथे आपल्या सारख्या सामान्य माणसाची वैचारिक क्षमता संपते तिथून या मडळीचा विचार सुरू होतो.म्हणूनच भारताच्या विद्यमान राजकारणातील या दोन बिग पॉलिटिकल ग्लम्बलर मध्ये झालेल्या भेटीचा अर्थ एव्हढ्या सहजा सहजी काढणे घाईचे ठरू शकते.

मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी या दोन राजकीय दिग्गजांमध्ये एक तासाहून अधिक काळ झालेल्या चर्चेत केवळ हवा पाण्याच्या गप्पा झाल्या असतील किंबहूना तब्येतीची विचारपूस करीत चाय पे चर्चा झाली असेल यावर विश्वास ठेवायला राजकीय अभ्यासक तयार नाहीत.या भेटीला अनेक संदर्भ आहेत.त्यातून अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.विशेषतः जुलैच्या या पंधरवड्यात या भेटींचा क्रम लक्षात घ्यायला हवा.महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे.या अस्थिरतेला काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पण वादग्रस्त वक्तव्यांची जोड मिळाली आहे.हे सरकार त्यांच्याच वजनाने कोसळेल या भाजपच्या मंडळींच्या प्रतिक्रियेला पुरक ठरणारी काँग्रेसची भुमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुःखी ठरली तर नवल नाही.नेमक्या याच काळात वर उल्लेख केलेल्या भेटी पार पडल्या आहेत.हा केवळ योगायोग मानता येणार नाही,कुणी कितीही नाकारले तरी ठाकरे मोदी फडणवीस भुजबळ या भेटींमागे शरद पवारांची खेळी आहे हे नाकारता येणार नाही.
शरद पवार सहजासहजी प्रतिक्रीया देत नाहीत.दिली तरी त्याचा अर्थ समजू देत नाहीत.लव अँड हेट या गृहीतकाचा चपखल वापर करतात.कुणाशी लवकर शत्रूत्व घ्यायचे नाही घेतले तर त्याचा कार्यकाल संपविल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.ही शरद पवारांची कार्यशैली ज्ञात असलेले राजकारणी शरद पवारांविषयी जपून बोलतात,वागतात.नेमकी ही चुक नाना पटोलेंकडून जाणतेअजाणतेपणी घडली असावी.आणखी एक मुद्दा या ठिकाणी दुर्लक्षीत करता येणार नाही.प्रशांत किशोर यांची शरद पवार ,राहूल गांधी,प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची सुरू असलेली चर्चा,भाजपविरोधी पक्षाची मोट बांधण्याबाबत असलेली चर्चा अशा विविध संदर्भांने मोदी पवार यांच्या भेटीकडे पाहीले जात आहे.
या भेटीतून प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर अर्थ काढीत असला तरी या भेटींचा अर्थ एव्हढ्या लवकर आपल्या हाती येण्याची शक्यता धुसर आहे.मुळात तुर्तास शरद पवार हे भाजप विरोधी आघाडीचे कप्तान,गोलकिपर,विकेटकिपर आहेत.अशा या मुख्य सुत्रधारालाच पळविल्याचा संदेश या भेटीतून भाजप देऊन युपीए सशक्त बनविण्याच्या प्रयत्नांना खोडा घालू शकतो,तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न थांबवले नाहीतर आमच्याकडे पर्याय आहे असा संदेश शरद पवार काँग्रेसला देऊ शकतात.राहीला प्रश्न राष्ट्रपती पदाचा.शरद पवार यांच्याबाबतीत ही शक्यता नाही सारखी आहे.कारण राष्ट्रवादीची तेव्हढी ताकद नाहीच.आणि मिशन २०२४ मध्ये विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची वाढणारी संभाव्य ताकद लक्षात घेता भाजपाला तीनशे प्लसचे ध्येय गाठणे कठीण ठरेल.अडिचशेच्या जवळपास संख्याबळ मिळाल्यानंतर मोदींना राष्ट्रपतीपदासाठी होयबा उमेदवार अपेक्षीत असणार.काठावरच्या बहुमताच्या सरकाराला अडचणीच्या काळात राष्ट्रपतींचा मोठा आधार असतो.या पार्श्वभूमीवर यावेळी पुन्हा महिला राष्ट्रपती झाल्या आणि त्यातही एखादे गुजराती नाव समोर आले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको.याचाच अर्थ भाजपकडूनही शरद पवार यांच्या नावाला पसंदी मिळणे दुरापास्तच.
या भेटीतून आणखी एक अर्थ काढला जात आहे,संसदीय अधिवेशन सुरू होत आहे,केंद्र सरकारसमोर कृषी विधेयक आणि चीनचा प्रश्न हे दोन कळीचे मुद्दे आहेत.यादृष्टीनेही शरद पवारांची भेट महत्वाची मानली जात आहे.एकूणच शरद पवार हे राजकारणातील तरबेज गोलंदाज आहे,एखादा तिसरा किंवा गुगलीचा भेदक मारा करून भल्याभल्यांची विकेट घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.पैसा आणि व्यक्तिगत हितसंबंध या भांडवलावर शरद पवारांचे राजकारण सुरू असते,आजच्या भेटीतूनही त्यांनी अशाच प्रकारचे राजकारण करून अनेकांची विकेट घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.तुर्तास एव्हढाच निष्कर्ष काढू शकतो,बाकी अर्थ अनर्थ आणि अन्वयार्थासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल.

COMMENTS