Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादमध्ये उभारणार पहिले महिला कृषी महाविद्यालय

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची विधानपरिषदेत घोषणा

नागपूर ः औरंगाबाद येथे राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिष

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र
कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई

नागपूर ः औरंगाबाद येथे राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत केली आहे. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.


औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 2 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचे देखील सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अखेर औरंगाबादमध्ये राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा कृषीमंत्री सत्तार यांनी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन अत्यंत सुपीक असून जिल्ह्यात जायकवाडी, शिवना टाकळी, गिरिजा, नांदूर मधमेश्‍वर असे मोठे प्रकल्प आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या औरंगाबाद परिसरातील मुलींना शेतीविषयक ज्ञान उपलब्ध व्हावे व शेती सुधारण्यास, पर्यायाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल असा मुद्दा सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडले. म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे पहिले कृषिमंत्री म्हणून आपण ठाम भूमिका घ्यावी व खास बाब म्हणून औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही भूमिका सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडली होती.

COMMENTS