पिक विम्याच्या मागणीसाठी भिक मागो आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिक विम्याच्या मागणीसाठी भिक मागो आंदोलन

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झाली त्यांना तुटपुंज्य

बनावट लस देऊन 390 लोकांकडून 5 लाख रुपये हडपण्याचा आरोप l पहा LokNews24
माजी आमदार मुरकुटे यांना जामीन मंजूर
कचर्‍यावर प्रक्रिया न करताच कोट्यवधींची बिले ; खा. सुळे यांचा आरोप

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झाली त्यांना तुटपुंज्या स्वरूपात मदत मिळाली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वडवणी येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. यातून मिळालेला निधी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भीक मागो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा लवकरात लवकर अदा करावा तसेच पीक विम्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे.

COMMENTS