Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचे पुन्हा सावट, महापालिका झाली सज्ज  

  कल्याण प्रतिनिधी - राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार क

OMG! Rinku Rajguru ‘या’ अभिनेत्यासह डिनर डेट | LokNews24
अवघ्या 8 दिवसात उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट
साकीनाका बलात्कार प्रकरण : महिनाभरात गुन्हा उघडकीस आणणार, पोलिसांचे आश्वासन

  कल्याण प्रतिनिधी – राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केडीएमसी आयुक्त दांगडे यांनी आरोग्य विभागाला सतर्क करत सद्यस्थितीचा आढावा आणि भविष्यातली तयारी यासंदर्भात बैठकीचं आयोजन केले होते. केडीएमसीचे रुग्णालय आणि  आरोग्य केंद्रांच्या ओपीडी मध्ये कोरोनाचू लक्षण आढळलेल्या रुग्णांची त्वरित आरटीपीसीआर आणि अँटिजंट टेस्ट करण्यात येणार आहे. अशा  रुग्णांच आयसोलेशन करून त्यांचे रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्यास  जिनोम सीक्वेन्सीसाठी पाठवण्यात  येणार आहे. कल्याण पश्चिमेला गौरीपाडा येथे पालिकेची लॅब असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे खाजगी लॅबलासुद्धा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. टिटवाळा, कल्याण पूर्वेतील शक्तीधाम तसेच विठ्ठलवाडी येथे तीन रुग्णालय उभारण्याबाबत पालिका विचाराधीन आहे. मात्र  सध्या  कोरोनाची कोणतीच लस पालिकेकडे उपलब्ध नाही अशी माहिती समोर आली असून लसींचा मुबलक साठा कधी उपलब्ध होतो? ते देखील पाहावे लागणार आहे.

COMMENTS