Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना महिलेचा मृत्यू

जालना प्रतिनिधी - जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार्या एका महिलेचा मृत्यू झालाय. कस्तुरबा बळवंत गायकवाड असं या महिलेचं नाव असून त्य

द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
दसरा मेळाव्याचा संघर्ष !
100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा !

जालना प्रतिनिधी – जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार्या एका महिलेचा मृत्यू झालाय. कस्तुरबा बळवंत गायकवाड असं या महिलेचं नाव असून त्या मागच्या चाळीस दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्याचबरोबर या जागेवर आयटीआय कॉलेजचे प्राचार्य यांना जाण्यास कोर्टानं सक्त  मनाई केली होती. मात्र त्यानंतर आयटीआय कॉलेजचे प्राचार्य दोन शिक्षकासह तिथे आले होते आणि गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिविगाळ केली होती. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी कस्तुरबा बळवंत गायकवाड या मागच्या चाळीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.आज त्यांचा मृत्यू झाला आहे. 

COMMENTS