Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वयोवृद्ध व्यक्तींला शेजारच्या कडून बेदम मारहाण

 जालना प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील धाकलगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. एकनाथनगर वस्तीवर राहणारे पंढरीनाथ लटपटे हे नारळाच्या

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
केंद्रीय मंत्री कोशल किशोरच्या घरी तरूणाची हत्या
सीबीआयची देशात 9 ठिकाणी छापेमारी

 जालना प्रतिनिधी– जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील धाकलगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. एकनाथनगर वस्तीवर राहणारे पंढरीनाथ लटपटे हे नारळाच्या झाडाखाली झोपलेले होते.त्याचवेळी  शेजारीण बाईने त्यांच्या बाजूला कचरा फेकला.त्यामुळे बाबांनी कचरा टाकू नका असे त्यांना सांगताच अगोदर बाईने शिव्यांची लाखोली वाहिली व जाऊन तिच्या घरी कचरा टाकायला हट कल्याचे सांगितले.याचा  राग धरून शेजारी महिलेच्या नातेवाईकांनी म्हाताऱ्या बाबांना कुऱ्हाड, रॉड, लठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली.त्यात त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले, उजव्या पायाची हाडे तुटली असून रक्तबंबाळ झालेल्या बाबांना अगोदर वडिगोद्री, त्या नंतर अंबड येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल केले तिथे प्रार्थमिक उपचार करून पायाच्या जखमेवर टाके घालून त्यांना जालना येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी रेफर करण्यात आले व दोन दिवसही तब्येत न सुधारल्याने,जखमा खूप असल्याने त्यांना जालना शहरातील दीपक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचे सांगण्यात आल्याने शेवटी तिसऱ्या दिवशी बाबांच्या मुलांनी,सूनेनी त्यांना जालना शहरातील दीपक हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. अंगावर कपडे नाही, उपचारांचा पत्ता नाही अशी बिकट परिस्थिती झाली असून सगळे कुटुंब दहशती खाली वावरत आहे.त्यामुळे या कुटुंबांनी शेजाऱ्या पासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.ज्यांनी मारहाण केली ते नेहमीच दमदाटी करतात त्यामुळे हे कुटुंब आता खूपच दहशतीत असल्याने गावकऱ्यांनी आमचे संरक्षण करावे व आम्हाला न्याय द्यावा अंशी मागणी या कुटुंबीयाने केली आहे.या मारहाणीची तक्रार गोंडी पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

COMMENTS