Homeताज्या बातम्यादेश

भारत जोडो यात्रा थांबवण्यास राहुल गांधींचा नकार

यात्रा रोखण्याचे बहाणे असल्याचा केला आरोप

चंदीगड/वृत्तसंस्था ः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारत जोडो यात्रेत जर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर, य

डॉ. हरी नरके : अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळतो !
प्रा.अश्विनी जाधव  यांना पीएच.डी. प्रदान
फलटणमध्ये रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

चंदीगड/वृत्तसंस्था ः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारत जोडो यात्रेत जर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर, यात्रा थांबवावी यासंदर्भातील पत्र काँगे्रस नेते राहुल गांधींना दिले होते. मात्र राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले केंद्र सरकारने आता नवा फॉर्म्युला काढला आहे. मला पत्र पाठवले आहे. त्यात मास्क घाला, कोविड पसरतोय असे सांगण्यात आले आहे. हे सर्व यात्रा रोखण्याचे बहाणे आहेत. भारताच्या वस्तुस्थितीला हे लोक घाबरलेत. आमची यात्रा काश्मीरपर्यंत जाईल.


उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रा रोखण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती उद्भवल्यामुळे देश वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याची गरज आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानातून हरियाणात पोहोचली आहे. राज्यातील यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. राहुल गांधी नूंहच्या ऐतिहासिक गांधीग्राम (घासेरा) पोहोचले. तिथे त्यांच्या पायाला पट्टी बांधल्याचे दिसून आले. राहुल मागील 106 दिवसांपासून पायी प्रवास करत आहेत. घासेरा गावच्या ग्रामस्थांनी मेवाती पगडी घालून त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी येथे म्हणाले यात्रेत आम्ही 100 दिवसांहून जास्त दिवस चाललो. त्यात हिंदू, मुस्लिम, शिख व ख्रिश्‍चन सर्वजण चालत आहे. यापैकी कुणीही कुणाचा द्वेष केला नाही. कुणाचा धर्म विचारला नाही. जात विचारली नाही. सर्वांनी एकमेकांचा सन्मान केला. गळाभेट घतेली. काल आमचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पडले. त्यांना सर्वांनी धरून उठवले. कुणीही तू कोणत्या जाती-धर्माचा आहेस हे विचारले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नरेंद्र मोदींचा द्वेषाचा भारत प्रत्यक्षात आला नाही पाहिजे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

COMMENTS