पुणे : पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणार्या आणिसंघटितपणे गुन्हेगारी करणार्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघ
पुणे : पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणार्या आणिसंघटितपणे गुन्हेगारी करणार्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आहे. ही रक्कम न भरल्यास 1 वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे.
अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. देशपांडेसमवेत प्रदीप गवळी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सेक्स रॅकेटमुळे पुणे हादरले होते. यानंतर कल्याणी देशपांडे हिच्यावर शहरातील चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलिस ठाण्यात 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. देशपांडे हीचे अनेक गुंडांसमवेत तिचे संबंध असल्याने तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
COMMENTS