नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नसतांना, शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांविरोधात आक्रमक होत अ
नागपूर/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नसतांना, शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांविरोधात आक्रमक होत असतांना, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा वाद पाहण्यास मिळाला आहे. अधिवेशनामध्ये दोन्ही पक्षांना वेगळी कार्यालय देण्यात आली आहे. जुने कार्यालय हे शिंदे गटाला मिळाले त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले.
नागपूर विधानभवनात शिवसेनेच्या दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालये देण्यात आली आहे. ठाकरे गटाला आणि शिंदेंच्या पक्षाला वेगवेगळे कार्यालय देण्यात आले. पूर्वीचे शिवसेनेचे कार्यालय शिंदेंच्या पक्षाला मिळाले आहे. त्यामुळे या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तसेच कार्यालयाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय असा फलकही लावण्यात येणार आहे. सुरुवातीला ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षाला शेजारीशेजारी कार्यालय देण्यात आले होते. मात्र यामुळे कोणताही वाद होऊ नये यासाठी आता पूर्वीचे शिवसेनेचे कार्यालय शिंदे पक्षाला तर ठाकरेंच्या पक्षाला कार्यालयासाठी नवी जागा देण्यात आली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. ’अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा सन्मानाचा आहे आणि योग्य आहे. अमित शहा यांच्यासमोर चर्चा झाली. हे पहिल्यांदाच घडले आहे. ही बाजू त्यांनी गांभीर्यांनी घेतली. आम्ही ठोसपणे सांगितले, आमच्या गाड्या अडवल्या जातात, गाड्या फोडल्या जाऊ शकतात, हे आम्ही सांगितले. शहा यांनी योग्य ती समज दिली. अशी घटना होणार नाही, कोर्टामध्ये प्रकरण आहे, सर्वांनी धीर धरला पाहिजे, असेही शहांनी सांगितले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अमित शहांनी मीडियामध्ये सुद्धा सांगितले, त्याचे विरोधकांनी स्वागत केले पाहिजे. याआधीचे जे सरकार होते, त्यावेळी किती मोर्चे निघाले, त्याला कुणी परवानगी दिली, त्याचीही माहिती घेतली पाहिजे. राजकारण करण्यासाठी आपल्याकडे खूप मुद्दे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. त्या ठिकाणच्या योजना होता. त्या बंद केल्या होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व सुरू केल्या आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ठाकरे गटाला पर्यायी जागा – शिवसेनेचं कार्यालय सोडण्याची वेळ आली तेव्हा वर्षानुवर्षे या कार्यालयात काम करत असलेले कर्मचारी भावून झाले.महिला कर्मचार्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. या महिला कर्मचार्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदेगटाकडे गेलंय. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
COMMENTS