नवी मुंबई प्रतिनिधी- नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणार्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने करडी नजर ठेवलेय. या पार्ट्यामध्ये वापर
नवी मुंबई प्रतिनिधी– नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणार्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने करडी नजर ठेवलेय. या पार्ट्यामध्ये वापरले जाणारे मद्य मोठ्या प्रमाणावर गोवा तसेच इतर परराज्यांतून आणण्यात येतात. मात्र या अवैध मद्य साठा पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर असून हा मद्यसाठा पकडण्याची धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केले. पनवेल जवळील मौजे कोपरा गावाच्या हद्दीतुन जाणाऱ्या सायन – पनवेल महामार्गावर सापळा रचून उत्पादन शुल्क विभागाने संशयित ट्र्कला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे ७७ लाख रुपयांचा अवैध मद्याचा साठा सापडलाय. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे आणण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईत रॉयल ब्लु व्हिस्कीच्या बाटल्यांचे ८९८ बॉक्स सापडलेत. या प्रकरणी ट्रक चालक संदीप पंडित व समाधान धर्माधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आली.
COMMENTS