Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार कोसळला ; गुंतवणूकदारांचे नुकसान

मुंबई/प्रतिनिधी ः अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाचे पडसाद गुरुवारी भारतीय शेअर बाजार उमटले. गुरुवारी शेअर बाजास सुरु

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी; मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे वक्तव्याने अडचणींत वाढ
महाआरतीच्या कावड मिरवणुकीत लक्षवेधी अघोरी नृत्य
‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार : उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई/प्रतिनिधी ः अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाचे पडसाद गुरुवारी भारतीय शेअर बाजार उमटले. गुरुवारी शेअर बाजास सुरु होताच सेंन्सेक्स निफ्टीने चांगलाच धसका घेतला. दिवसअखेर सेंन्सेक्समध्ये 878.88 अंशांची म्हणजे 1.40 टक्क्यांची घसरण झाली, सेन्सेक्सने 62 हजारांची अंशपातळी तोडत 61,799.03 अंश पातळीवर तो स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 245.40 अंशांची म्हणजेच 1.32 टक्क्यांची घट झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवातच घसरणीने झाली. सकाळी 9.02 मिनिटांच्या दरम्यान सेंन्सेक्समध्ये 116.82 अंश घसरणीसह 62,561.09 अंश पातळीवर खुले झाले. तर निफ्टीमद्ये 41.70 अंशांची म्हणजे 0.22 टक्के घसरणीसह 18.618.60 च्या अंशपातळीवर खुले झाले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 250 अंशांची घट झाली.सर्वात जास्त घसरण आयटी इंडेक्समध्ये झाली. मात्र बॅक निफ्टी आणि मिडकॅप इंडेक्समध्ये वाढ झाली होती. पण इंट्रा डेनंतर इंडेक्समधली घसरण सुरुच राहिली. दिवसअखेर शेअर बाजारातील ही घसरण सुरुच राहिली.

COMMENTS