पुणे प्रतिनिधी - महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपचे नेते, उच्च व
पुणे प्रतिनिधी – महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपचे नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली आहे. माझ्याकडून अनवधानाने ते शब्द निघाले, कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता,’ असे त्यांनी म्हटले आहे.
पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली होती. शाईफेकीनंतर पाटील यांनी धमकीची भाषा केल्याने व पत्रकारांनाही दोष दिल्याने वातावरण चिघळले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ’महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानानं निघालं, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे, पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक असल्याचे म्हणत माफी मागितली आहे. तसेच हा वाद थांबवण्याची त्यांनी विनंती केली आहे.
COMMENTS