Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रस्ता रोको

पाथर्डी प्रतिनिधी - राष्ट्रीय महामार्गाचे 222 चे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमदार निलेश लंके यांनी आमरण उ

मढी देवस्थानचा पैसा आणि मालमत्तेच्या गैरवापराला विरोध केल्यानेच मला मारण्याचा कट ः संजय मरकड
बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू ; संगमनेर बसस्थानकावरील घटना
ध्वजरोहनने शनिशिंगनापुरात शनिजयंती उस्तवा सुरुवात

पाथर्डी प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गाचे 222 चे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील नाईक चौकात सकाळी भाजप वगळता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले;दरम्यान आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दुपारच्या सुमारास अज्ञात कार्यकर्त्यांनी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाच्या आवारात खुर्ची  कार्यकर्त्यांनी पेटवून दिली.तसेच रस्त्यांवर टायर पेटवून रस्ता बंद करण्याचा देखील प्रयत्न केला.दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने आज मात्र हिंसक वळण लागले आहे. सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे पुढील उपाययोजना करत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

COMMENTS