देवळाली प्रवरा प्रतिनिधी - राज्यात सहा महसूल विभागात नव्याने तलाठी सझे आणि महसूली मंडळ निर्मितील राज्य सरकारच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे.
देवळाली प्रवरा प्रतिनिधी – राज्यात सहा महसूल विभागात नव्याने तलाठी सझे आणि महसूली मंडळ निर्मितील राज्य सरकारच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात नव्याने 3 हजार 110 तलाठी सज्जा आणि 518 महसूल मंडळाची निर्मिती होणार आहे. यात नाशिक विभागात 689 तलाठी सझे आणि 115 नवीन महसूली मंडलांचा समावेश राहणार आहे.
नगर जिल्ह्यात नव्याने 202 तलाठ्यांची पदे आणि 34 महसूल मंडळाला मान्यता देण्यात आलेली असून यामुळे या नवीन पदावर महसूल विभाग नोकर भरती करून शकणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. यात तलाठी सज्जा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानूसान नवीन तलाठी सज्जा आणि महसूली मंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणार्या उपसमितीने अभ्यास करून याबाबतचा अहवाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाला सादर केला होता.या अहवालाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर नवीन सज्जा आणि महसूली मंडळाच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. यात नाशिक विभागात नाशिक जिल्ह्याला 175 तलाठी सज्जा आणि 29 महसूली मंडळे, धुळे जिल्ह्यात 166 तलाठी सझे आणि 28 महसूली मंडळे, जळगाव जिल्ह्यात 31 तलाठी सझे आणि 24 महसूली मंडळे आणि नगर जिल्ह्यात 202 तलाठी सझे आणि 34 महसूली मंडळांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्हा मात्र यातून वगळण्यात आलेला आहे. यासह महसूल विभागाने राज्यातील विभागनिहाय नव्याने मंजुरी दिलेल्या तलाठी सज्जे आणि महसूली मंडळ अधिकारी यांची वेतन श्रेणी देखील निश्चित केलेली आहे. यात तलाठी पदासाठी 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये आणि महसूली अधिकारी यांच्यासाठी 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये वेतनश्रेणीला मान्यता देण्यात आलेली आहे.
लवकरच भरतीची शक्यता – राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राज्यात नवीन तलाठी सज्जा आणि महसूली मंडळाच्या पदाना मान्यता दिल्याने लवकरच या पदासाठी महसूल विभागाला भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्यांना संधी उपलब्ध होणार आहे.
COMMENTS