Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात येणार लव्ह जिहाद विरोधी विधेयक

मुंबई प्रतिनिधी- वसई येथील श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रात

अपघात आणि सुरक्षेची चिंता
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार
कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पक्ष कार्यालय बंद केले याला आमचे समर्थन आहे – शितल म्हात्रे 

मुंबई प्रतिनिधी– वसई येथील श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याचबरोबर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची मागणी देखील नागरिकांतून होती होती. अखेर राज्य सरकार 19 डिसेंबरपासून सुरु होणार्‍या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणण्याच्या तयारी करत आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठकरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपच्या अनेक आमदारांनी तसेच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसेच राज्यात लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याच्या घटना घडल्याचा दावा भाजपच्या आमदारांकडून केला जात होता. त्यातच लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीमध्ये तिचा लिव्ह इनमधील पार्टनर आफताब याने केलेल्या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उमटील आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या हा लव्ह जिहादच असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. आता या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपने पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच हे लव्ह जिहादविरोधी विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर आमदार नितेश राणे अधिक अभ्यास करत आहेत. तसेच महिलांच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेणार्‍या चित्रा वाघ यांनीही अशा कायद्याची आवश्यता असल्याचे मत मांडले होते. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले गेल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाबाबत महाविकास आघाडी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS