Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

पैठण प्रतिनिधी - राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच सुरु झाली असतांनाच, शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षणमं

समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद l पहा LokNews24
काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)

पैठण प्रतिनिधी – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच सुरु झाली असतांनाच, शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदाद पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ’कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ’कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात पुढे म्हणाले, ’अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशामध्ये शाळा कुणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करतांना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली’. ’शाळा सुरु करायच्या आहेत आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा-दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन ’सीएसआर’च्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपाल म्हणाले होते, ’तुम्हाला कुणी विचारले की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील’ ’शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

COMMENTS