Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये डॉक्टर विरोधात पोक्सो गुन्हा

संस्थेत अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

संगमनेर प्रतिनिधी - संगमनेर शहरातील एका डॉक्टरने संस्थेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याच्या कारणावरून डॉक्टर विर

कोरोनाची चाचणी टाळण्यासाठी बिहार मधील प्रवाश्यांनी काढला पळ; | ‘मोठी बातमी’ | Lok News24
मोटारसायकल चोरणारी चौथी टोळी जेरबंद
जुनी पेन्शन साठी क्रांतीची ज्योत पेटवा – प्रा किसन चव्हाण

संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर शहरातील एका डॉक्टरने संस्थेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याच्या कारणावरून डॉक्टर विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
29 नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजता गोल्डन सिटीमधील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी संस्थेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोपीने या मुली पाठोपाठ बाथरूममध्ये जात तिचा विनयभंग केला तसेच उद्या नवर्‍याच्या घरी गेल्यावर काय करणार असे म्हणत चल माझ्या गाडीत बस, असे विचित्र हावभाव करून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. सातवीच्या वर्गात शिकणार्‍या एका आदिवासी समाजाच्या मुली सोबत हा प्रकार घडल्याने शहर पोलिसांनी डॉ. इथापे यांच्या विरोधात विनयभंग, पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव करत आहेत.

COMMENTS