मुंबई प्रतिनिधी - ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायतीत ठाकरे गट शिवसेना व्यतिरिक्त एक
मुंबई प्रतिनिधी – ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायतीत ठाकरे गट शिवसेना व्यतिरिक्त एकाही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्याची छाननी नंतर केवळ विजयाची घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच आनंद व्यक्त केला आहे.
सत्ताधारी ठाकरे गटाच्या शिवाय निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विरोधकाकडे एकही उमेदवार सापडला नसल्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घारापुरी ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा भगवा निविर्वाद, बिनविरोध फडकल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच घारापुरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी भाजप समर्थकांनी केली होती.निवडूकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तिकाही प्रसिद्ध केली होती.उमेदवारांची चाचपणीही करुन निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली होती.
COMMENTS