गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावून वहन क्षमता देखील कमी झाली होती. हे पाण

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला
पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा
शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा

कोपरगाव प्रतिनिधी : शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावून वहन क्षमता देखील कमी झाली होती. हे पाणी वाया जावू नये, पूर्ण क्षमतेने पाणी शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचले पाहिजे व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना देखील नियमित पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी उजवा-डावा कालवा दुरुस्तीचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन पूर्ण करून महाविकास आघाडी सरकार असतांना तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून 300 कोटी निधी मजूर करून घेतला आहे. त्यापैकी मंजूर झालेल्या 72 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 36 कोटीची कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून निफाड तालुक्यातील रुई, देवगाव व कोपरगाव तालुक्यात ब्राम्हणगाव येथे कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.


कोपरगाव विधानसभा मतदार संघासह निफाड, शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती व शेतकर्‍यांचे भवितव्य व अनेक पाणी पुरवठा योजना देखील या गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांवर अवलंबून आहे. या दोन्ही कालव्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून शेती सिंचनाचा, पाणी पुरवठ्याचा भार हे कालवे ब्रिटीश काळापासून वाहत आहे. नांदूर-मध्यमेश्‍वर बंधार्‍यापासून 110 किलोमीटर पर्यंत वाहणारा उजव्या व 90 किलोमीटरपर्यत वाहत जाणारा डाव्या कालव्यांचे आयुर्मान 100 वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात होते तर दुसरीकडे छोटे पूल, एस्केप बंधारे, मोर्‍यांची बांधकामे मोडकळीस आल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी होवून त्याचा मोठा परिणाम सिंचनावर व या कालव्यावर अवलंबून असणार्‍या कोपरगाव शहरासह अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांवर होत होता. मागील अनेक वर्षापासून लाभधारक शेतकर्‍यांना सिंचनासाठी डाव्या-उजव्या कालव्याच्या येत असलेल्या अडचणींची व पाणी पुरवठा योजनांना पाणी उचलण्यासाठी येणार्‍या अडचणींची दखल घेवून कालवे दुरुस्तीचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करून आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 300 कोटीच्या निधीला मिळालेल्या मंजुरीतून प्रत्येक वर्षी 100 कोटी निधी मिळणार आहे. त्यापैकी मंजूर असलेल्या 72 कोटी निधी पैकी 36 कोटीची दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित 36 कोटी निधीच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS