हिंगोलीसह नांदेड भुकंपाच्या धक्क्याने हादरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीसह नांदेड भुकंपाच्या धक्क्याने हादरले

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि यवतमाळ रविवारी भुकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही ह

“नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ” 
याह्या सिनवार हमासचे नवे प्रमुख
राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि यवतमाळ रविवारी भुकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला. नांदेड येथे झालेल्या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर 4.4 एवढी नोंदली गेली आहे. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर तीन वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहेत. मात्र, रविवारी सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता.
भुगर्भात झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामीण भागातून गावकर्‍यांची चांगलीच पळापळ झाल्याचे चित्र होते. यवतमाळ जिल्हयातील महागाव येथे भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी 8.30 वाजता भुगर्भातून पुन्हा मोठा आवाज झाला. विशेष म्हणजे या आवाजाची व्याप्ती संपूर्ण जिल्हाभर होती. हिंगोली शहरातही हा आवाज चांगलाच जाणवला. सुमारे 5 ते 7 सेकंदपर्यंत हा आवाज होता. तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, मरसुळ, वाई, आंबा, कोर्टा, टाकळगाव, म्हातारगाव, इंजनगाव, सेलु, आंबा, शिवपुरी, बोराळा, डोणवाडा या भागातही भुकंपाचे धक्के जाणवल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. हिंगोली तालुका, कळमनुरी तालुक्यात देखील हे धक्के जाणवले आहे. या संदर्भात पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या आवाजामध्ये हा सर्वात मोठा आवाज होता. मातीच्या घरांना काही ठिकाणी तडे गेल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप
स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाच्या भुकंपशास्त्र विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 4.4 रिश्टर स्केलचा भुकंप झाल्याचे सांगितले. तोच भुकंप हिंगोली जिल्हयात जाणवला का याची माहिती घेतली जात आहे. तर प्रशासनाने सदर भुकंपाचे केंद्र बिंदू यवतमाळ जिल्हयातील महागाव येथे असल्याचे सांगितले. दहा किलो मिटर खोलीवर हा भुकंप झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS