Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघातांचे प्रमाण वाढले

पुणे : पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघात कमी होण्याचे काही नाव घेत नाहीये. या वर्षातील सुरुवातीच्या 9 महिन्यांची एक्स्प्रेस हायवेवरील अपघ

नेवाशाच्या पावन गणपतीला भाविकांची चतुर्थीनिमित्त गर्दी
महाधन क्रॉपटेकच्या सहाय्याने  कांदा उत्पादनात  १५ ते २० टक्क्यांनी वाढ 
यलम प्रिमिअर क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स अजिंक्य

पुणे : पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघात कमी होण्याचे काही नाव घेत नाहीये. या वर्षातील सुरुवातीच्या 9 महिन्यांची एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची चिंताजनक आकडेवारी समोर आलीय. अवघ्या 9 महिन्यात मुंबई पुणे महामार्गावर एकूण 145 अपघातांची नोंद करण्यात आलीय. त्यातीर 44 अपघात गंभीर स्वरुपाचे होते.
जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या 9 महिन्याच्या कालावधीत झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. या अपघातांमध्ये एकूण 47 प्रवाशांनी जीव गमावलाय. तर अनेकजण जायबंदी झालेत. या अपघातांचे प्रमुख कारण नेमके काय आहे, हे देखील आता समोर आले. पुणे मुंबई एक्स्प्रेस वर अपघात होण्याचे प्रमुख कारण हे वाहन चालकांचा बेशिस्तपणा असल्याचे दिसून आले आहे. लेन कटिंग केल्यामुळे आणि लेनची शिस्त न पाळल्यामुळे बहुतांश अपघात झाले आहेत, असे समोर आले. या वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांनी लेनची शिस्त पाळण्याची गरज व्यक्त केली जाते. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर एक्स्प्रेस वे वरील अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, यानंतर एक्स्प्रेस हायवेवरील होणारी वाहतूक नियमाप्रमाणे व्हावी, यासाठी काटेकोर उपाययोजना राबवली गेली होती. वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंड आकारण्याच मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती. वाहतूक पोलिसांच्या सक्रियतेमुळे मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र ही कारवाई आता पुन्हा थंड पडल्याने सर्रासपणे वाहतूक नियम पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र द्रूतगती महामार्गावर पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात वेग मर्यादा न पाळणार्‍या तब्बल 7 हजार 325 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, 1 कोटी पेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आलेली. संपूर्ण द्रूतगती महामार्गावर आता सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. तरी देखील वाहन चालकांमध्ये अजूनही जागरुकता पाहायला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. वाढते अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे ठाकले.

COMMENTS