Homeताज्या बातम्या

कर्नाटकमध्ये जाणार्‍या बसेस सांगली येथे थांबवल्याने सीमा भागात तणाव

सांगली / प्रतिनिधी : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये घेणार, असा दावा केल्यानंतर दोन्ही राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटल

अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार
माळीवाडा बस स्थानकातून दोन वृद्ध महिला बेपत्ता
भोसरीतील दीपक वाघमारे खुनाच्या प्रकरणातील आरोपींना चार तासात

सांगली / प्रतिनिधी : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये घेणार, असा दावा केल्यानंतर दोन्ही राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. सीमा भागातील गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणार्‍या व महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी बस वाहतूक थांबवण्यात आली. पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बस घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, बस वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बस या कर्नाटकातील सीमेवरील गावातूनच परत येत आहेत. मात्र या मार्गावर कोठेही दगडफेक झाली नाही, असे पोलीस आणि एसटी वाहतूक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

COMMENTS