Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जगेल तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत ठेवणार नाही’

असं म्हणत पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी - लग्न करणार तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत राहू देणार नाही आणि मी राहणार नाही, असं म्हणत औरंगाबादमध्ये एका तरुणाने स्वत:ला

रा. रं. बोराडे यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
विखेंचे किती वीज बिल माफ केले, मग शेतकर्‍यांची वीज का तोडता ?

औरंगाबाद प्रतिनिधी – लग्न करणार तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत राहू देणार नाही आणि मी राहणार नाही, असं म्हणत औरंगाबादमध्ये एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली होती. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून आपल्या प्रेयसीला मिठी मारली होती. त्यामध्ये गजानन मुंडे हा 95% जळाला होता. त्याचा रात्री उपचारादरम्यान बारा वाजता मृत्यू झाला आहे.   तर तरुणीवर अजूनही उपचार सुरु आहेत.

COMMENTS