Homeताज्या बातम्यादेश

कुपवाडामध्ये हिमस्खलनात तीन जवानांना वीरमरण

कुपवाडा प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात शुक्रवारी संध्याकाळी हिमस्खलनाच्या तडाख्यात तीन जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्याचबरोब

नाशिकमध्ये ओबीसी आक्रोश मोर्चा l पहा LokNews24
राज्यात कायद्याचे नव्हे, ‘काय ते द्या’चे राज्य : फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

कुपवाडा प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागात शुक्रवारी संध्याकाळी हिमस्खलनाच्या तडाख्यात तीन जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्याचबरोबर दोन जवानांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना घडली तेव्हा 56 राष्ट्रीय रायफल्सचे हे पाच जवान नियमित गस्तीवर होते. अधिकार्‍यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले; मात्र जवानांना बाहेर काढेपर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला होता. इतर 2 जवानांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कुपवाडा येथील मच्छल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गस्तीवर असलेले भारतीय लष्कराचे तीन जवानांना वीरमरण आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गनर सौविक हाजरा, लान्स नाईक मुकेश कुमार, नाईक गायकवाड मनोज लक्ष्मण राव यांना शुक्रवारी हिमस्खलनात आपला जीव गमवावा लागला. गस्तीवर असताना या सैनिकांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. बर्फात अडकलेल्या 2 सैनिकांची सुटका करून त्यांना कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तिघांचाही बचाव करण्यात अपयश आल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा – जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एलओसीजवळ शनिवारी भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. प्रकरणाचा तपास सुरू आहे. 17 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला, मात्र ते शरण येण्याऐवजी मागे पळू लागले. त्यानंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. 19 नोव्हेंबरला या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. चकमक परिसरात लष्कराकडून अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

COMMENTS