इस्त्रोचा नवा विक्रम

Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रोचा नवा विक्रम

खाजगी रॉकेट ’विक्रम-एस’चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा प्रतिनिधी - अंतराळ क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवार

रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
खासदार नुसरत जहाँ यांची ईडीकडून चौकशी
आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

श्रीहरीकोटा प्रतिनिधी – अंतराळ क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी एका खाजगी कंपनीचे रॉकेट लॉन्च करुन इतिहास घडवला आहे. विक्रम-एस असे या खासगी रॉकेटचे नाव असून हैदराबादच्या स्कायरूट एयरोस्पेस नावाच्या खाजगी कंपनीने हे रॉकेट बनवले होते.
केंद्र सरकारने 2020 मध्ये अवकाश उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंतर ’स्कायरूट एरोस्पेस’ ही भारतीय अंतराळ कार्यक्रमात पाऊल टाकणारी भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील कंपनी ठरली आहे. इस्रोचे पहिलं खासगी रॉकेट श्रीहरीकोटा इथून लाँच करण्यात आले. या रॉकेटचे नाव विक्रम एस असे असून सतीश धवन अंतराळ केंद्रातून ते अवकाशात झेपावले. अंतराळात 81 किलोमीटर उंचीवर हे रॉकेट पोहोचणार असून स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने या रॉकेट लाँचिंगची तयारी केली. विक्रम सबऑरबिटल असे या खासगी रॉकेटचे नाव आहे. 550 किलो वजनाचे हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपलेंट रॉकेट आहे. हे रॉकेट 100 किमीपर्यंत झेप घेतल्यानंतर ते समुद्रात कोसळेल. रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी केंद्रीय अंतराळ मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हेसुद्धा उपस्थित होते. विक्रम एसच्या उड्डाणामुळे भारताचे नाव खासगी रॉकेट प्रक्षेपणात जगातील आघाडीच्या देशांमध्ये घेतले जाईल. विक्रम एस रॉकेट लाँचिंगच्या मोहिमेत दोन भारतीय आणि एक परदेशी असे तीन पेलोड आहेत. यामध्ये चेन्नईतील स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्रप्रदेशातील एन स्पेस टेक आणि आर्मेनियम स्टार्टअप इर्रूीाट स्पेस रिसर्च लॅब यांचा समावेश आहे.

COMMENTS