एअर इंडियात विलीन होणार 3 विमान कंपन्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एअर इंडियात विलीन होणार 3 विमान कंपन्या

कंपनी लवकरच करणार अधिकृत घोषण

मुंबई : काही दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या एअर इंडिया(Air India) विमान कंपनीचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी टाटा सन्सने कंबर कसली आहे. टाटा सन्सने एअर

‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ पाळणार : पंतप्रधान
दुर्दैवी! वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या | LOKNews24
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : काही दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या एअर इंडिया(Air India) विमान कंपनीचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी टाटा सन्सने कंबर कसली आहे. टाटा सन्सने एअरलाइन्स विस्तारा, एअर एशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या तीन कंपन्यांचे एअर इंडियात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टाटा सन्सचे हे नियोजन यशस्वी झाल्यास एअर इंडिया फ्लीट आणि मार्केट शेअरच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाइन बनेल. सिंगापूर एअरलाइन्स ही टाटा समूहाची भागीदार आहे. टाटा यांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत बोलणी सुरू आहे. टाटांनी सिंगापूर एअरलाइन्सशी याबाबत चर्चा केली असून विस्तारा टाटामध्ये विलीन करण्याचे मान्य केले आहे. सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहाच्या विस्तारामध्ये भागीदार आहे आणि या विलीनीकरणानंतर, विस्तारा चालवणारी टाटा सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन होऊ शकते. एअर इंडिया कमी किंमतीत पूर्ण सेवा देणारी विमानसेवा असेल. आठवडाभरात याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. दोन्ही विमान कंपन्या लवकरच व्यावसायिक ऑपरेशन सुरू करू शकतात. पण एक संस्था म्हणून काम सुरू होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो असे सूत्रांनी सांगितले. विस्तारा आणि एअर इंडिया लवकरच व्यावसायिक कामकाज सुरू करू शकतात. मात्र, टाटा सन्स आणि विस्ताराने सध्या यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS