मुंबई प्रतिनिधी - मुंबईत विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सीमा शुल्क मुंबई विमानतळावर 32 कोटी किमतीचे 61 किलो वजनाचे सोने जप्त
मुंबई प्रतिनिधी – मुंबईत विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सीमा शुल्क मुंबई विमानतळावर 32 कोटी किमतीचे 61 किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये 2 महिलांचा सामावेश आहे. मुंबई सीमा शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा इतकी मोठी कारवाई केली आहे.
कस्टम विभागाच्या माहितीनुसार, 4 भारतीय प्रवासी टांझानिया देशातून आले होते. या प्रवाशांनी सोने लपविले होते. या चौघांकडे 28. 17 कोटी किमतीचे 53 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. टांझानियातून येताना दोहा विमानतळावर सुडानी नागरिकाने एका कंबरेचा पट्टा दिला. त्यांची विचारपूस केल्यावर चौघे प्रवासी टांझानियातून आल्याचे कळले. या चार प्रवाशांनी शरीराला चारी बाजूने सोन्याची बिस्किटे गुंडाळली होती. या चौघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केले की, त्यांना अनोळखी सुडानी नागरिकाने दोहा विमानतळावर सोन्याची बिस्किटे दिली. दरम्यान, या सुडानी नागरिकाने त्यांच्यासोबत प्रवास केला नाही. या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या चौघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

COMMENTS