Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभुआप्पा-बुवाफन यात्रेतील बाजार शाळा नंबर 1 समोरील मैदानावर भरणार : विक्रमभाऊ पाटील यांची माहिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्री संभुआप्पा-बुवाफन यात्रेला कार्तिक पौर्णिमेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत भरणा

सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्री संभुआप्पा-बुवाफन यात्रेला कार्तिक पौर्णिमेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत भरणारे आठवडी बाजार हे शाळा नंबर 1 एक समोरील मैदानावर भरणार असल्याची माहिती विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांनी दिली.
विक्रमभाऊ पाटील म्हणाले, संभू आप्पा बुवाफन यात्रेत 4 आठवडी बाजार भरणार आहेत. यामध्ये आठवडी बाजार गुरुवार, दि. 10, रविवार, दि. 13, गुरुवार, दि. 17, रविवार, दि. 20 नोव्हेंबर असे बाजार भरणार आहेत. या बाजारात व्यापार्‍यांसाठी मैदानावर सुलभ शौचालय, स्वच्छतागृहाची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे. बाजारात बसण्यासाठी जागेची आखणी केलेली आहे. तरी व्यापार्‍यांनी आठवडी बाजारासाठी सहकार्य करावे. या आठवडी बाजारासाठी कर निरीक्षक शांतीप्रसाद पुंदे, माजी नगरसेवक आयुब हवालदार, संजयभाऊ पाटील, विजय पवार, गजानन फल्ले, संजय चव्हाण, बबलू कदम, राजेंद्र कळसकर, अजिंक्य वाळवेकर, अमीर मुंडे, रणजित होगले, नागेश पाटील, संदीप पाटील, रणजित जाधव, अतुल घोलप, प्रसाद पळसे, विनोद गुरंम प्रयत्नशील आहेत.

COMMENTS