पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 91 टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
कराड / प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 91 टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. तिन्ही गटामध्ये चुरस होती मात्र सभासदांकडून मतांचा कौल मिळणार हे गुरुवार, दि. 1 जुलै रोजी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे असतील याकडे उत्सुकता लागली आहे.
कृष्णा कारखान्यासाठी सरासरी 91 टक्के मतदान झाले असल्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
माळी म्हणाले, कारखान्याच्या 47 हजार 145 मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. त्यामुळे उर्वरित 37 हजार 145 मतदारापैंकी तब्बल 34 हजार 532 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. आज सकाळी आठ ते पाच यावेळेत 148 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळी दहापर्यंत सुमारे 21 टक्के, दुपारी 12 पर्यंत 45, दुपारी दोनपर्यंत 60, दुपारी चारपर्यंत 71, तर व सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे 73 टक्के मतदान झाले. कृष्णा कारखान्याच्या 47 हजार 145 मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. प्रत्यक्षात जे हयात मतदार आहेत. त्यांना विचारात घेतल्यास मतदानाची आकडेवारी 91 टक्केआहे. कृष्णा कारखान्याचे तीन हजार 613 मतदारांनी मतदान करणे टाळले.
कृष्णासाठी ता. एक जुलै रोजी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजमी सुरू होणार आहे. त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 74 टेबल मांडले जाणार आहेत. मतमोजणीला 325 अधिकारी यांची नियुक्त केले आहेत. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांना ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे, असेही आष्टेकर यांनी स्पष्ट केले.
COMMENTS