रेल्वे इंजिन चालवतानाचा व्हिडीओ दाखवून घातला लाखोंचा गंडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे इंजिन चालवतानाचा व्हिडीओ दाखवून घातला लाखोंचा गंडा

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे

कल्याण प्रतिनिधी  - आजकाल कोण कुणाची कशी फसवणूक करेल याचा काही नेम नाही. एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालविताना व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हिडीओ टाक

गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला : राज ठाकरे
आज पासून एसटी बस मध्ये महिलांना 50 टक्के सवलतीने प्रवास

कल्याण प्रतिनिधी  – आजकाल कोण कुणाची कशी फसवणूक करेल याचा काही नेम नाही. एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालविताना व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेत एका महाठगाने थेट व्हिडीओच दाखवत मोटरमन असल्याची बतावणी केली. आधी व्हिडीओ दाखवायचा मग विश्वास संपादन करायचा. ही आयडिया वापरून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. उमाशंकर बर्मा असे या भामट्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. बर्माने अजून किती जणांना फसवले याचा तपास पोलीस करत असून, त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS