परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचालकाचाही मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीन

उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू
कंटेनरने एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले
पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.

मुंबई प्रतिनिधी – मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीन विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला आहे. या तिन्ही विद्यार्थीनी परीक्षा देऊन घरी परतत होत्या. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.रिक्षा चालक उमर बडुर, हलिमा पोतेरे , असिया बडुर (20 रा. गोरेगाव), नाजनिन करबेलकर  अशी मृतांची नावे आहेत. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थीनी रिक्षाने खेड येथे परीक्षेसाठी गेल्या होत्या.परीक्षा  आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

COMMENTS