कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे

कोपरगाव शहर प्रतिनिधी - कोपरगाव मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असुन कोपरगाव मध्ये एकच एच.आर.सीटी केंद्र आहेत कोपरगांवची परिस्थिती पाहता पालिकेने फंडातुन एच.आर.सी.टी.

निरंजन जाधव यांनी अमेरिकेतून मिळवली पदवी
मंडलधिकार्‍यावर कारवाईसाठी शेतकर्‍यांचे उपोषण
AhmedNagar : बस बंद ? शाळा सुरु ..

कोपरगाव शहर प्रतिनिधी –  कोपरगाव मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असुन कोपरगाव मध्ये एकच एच.आर.सीटी केंद्र आहेत कोपरगांवची परिस्थिती पाहता पालिकेने फंडातुन एच.आर.सी.टी. स्कॕनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी पालिकेचे मुख्यधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. 

राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहेत. सध्या कोपरगावमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रुग्णांना बेड मिळेना बेड मिळेला त्यात  आॕक्सीजन तुटवडा आहेत. अशातच रुग्णांच्या उपचारात लागणारे रेमडेसिव्हर इंजेक्शनचाही तुटवडा आहे. इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी रुग्णांचे नातेवाईकांची धावपळ होत आहे. इंजेक्शन मिळेल या हेतुने मेडीकलच्या बाहेर रांगाच्या रांगा लागत आहेत.  याचा गैरफायदा अनेक जण घेत काळा बाजार करत असल्यामुळे नागरिकांची मोठी लुटमार होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोपरगाव मध्ये एच.आर.सिटी केंद्र देखील एकच असल्यामुळे सेंटरवर देखील मोठी गर्दी होत असल्याने सेंटरवर चालकांवर देखील ताण येत असल्याने रुग्णांची हेळसंड होत आहेत. याद्वारे रुग्णांकडून जास्तीचे अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहे या अशा परिस्थितीत मध्ये गोरगरीब जनतेला लुटायचे काम चालू आहे हे सर्व थांबविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना न्याय व दिलासा देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने पालिकेच्या फंडातून एच. आर. सिटी मशीन खरेदी केल्यास  सर्वसामान्य नागरिकांचे  पैसे ची बचत होईल तसेच उपचार घेणे पण सोपे जाईल याबाबत पालिकेने लवकरात लवकर निर्णय घेऊन कोपरगावच्या जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती निखाडे यांनी करुन त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की,  प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणा-या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे, मास्क लावणे, गर्दी न करणे,वेळोवेळी हात स्वच्छ धुवातेत. शक्यतो घरीच थांबावे अशी विनंती कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी नागरिकांना केली आहे.

COMMENTS