पुणे प्रतिनिधी - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे प्रतिनिधी – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा खून केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हा वीस वर्षीय तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेंव्हा वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आला. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण जखमी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीतच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे. तर या घटनेचे मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही.
COMMENTS