गुजरात राज्य गेल्या अडीच दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचे भाजपच्या तोंडी फेस आणला होता. मात्र थोडया
गुजरात राज्य गेल्या अडीच दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचे भाजपच्या तोंडी फेस आणला होता. मात्र थोडया मतांनी काँगे्रसचे उमेदवार पराभूत झाले आणि त्यानंतर निवडणून आलेले अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. गुजरात भाजपचा बालेकिल्ला असला, तरी यंदा भाजपला आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाचवेळी जाहीर होते. मात्र यंदा निवडणूक आयोगाने ही निवडणूक बर्याच उशीरा जाहीर केली. आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, आणि त्यात रंग भरायला सुरुवात होणार आहे. तब्बल 38 दिवस आचारसंहिता असणार आहे. तर 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. मात्र यावेळेस निवडणूक आयोगाला गुजरातची निवडणूक जाहीर करण्यास झालेला विलंब आणि त्यापूर्वी भाजप नेत्यांचे गुजरात दौरे, विविध घोषणा, यातून बर्याच बाबी अधोरेखित होतांना दिसून येतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा तीनवेळेस दौरे केले, विविध प्रकल्पांचे उद्धाटन, घोषणा, समान नागरी कायद्याचे वारे, यातून भाजपने एकप्रकारचे राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र निवडणूक लांबल्यामुळे निवडणूक आयोगाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हिमाचल प्रदेश विधानसभेची तारीख 8 जानेवारीला तर गुजरात विधानसभेची निवडणूक 8 फेबु्रवारीला संपत असल्याचे कारण आयोगाने दिले आहे. शिवाय गुजरात राज्यातील मोरबी येथील दुर्घटना, या बाबी आयोगाने सांगितल्या असल्या तरी त्या पटण्यासारख्या नक्कीच नाही. कारण गुजरातची निवडणूक 20 दिवस उशीरा जाहीर करण्याचे कोणतेही कारण त्यांना देता आलेले नाही. भाजप काँगे्रसला कधी गांभीर्याने घेत नाही. मात्र आपचे कडवे आव्हान असल्यामुळे भाजप सध्या सतर्क असल्याचे दिसून येतो. आपने दिल्लीत धर्मनिरपेक्ष अजेंडा पुढे करत दिल्ली काबीज केली, तर पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांना पुढे करून निवडणूक जिंकली. मात्र गुजरातमध्ये केजरीवाल हिंदुत्वांचा मुद्दा पुढे करतांना दिसून येत आहे. केजरीवाल आता चलनी नोटांवर लक्ष्मी, गणेशाची चित्रे लावण्यासह वृद्धांना श्रीराम जन्मभूमी मंदिराचे दर्शन करण्याचा वायदा करीत आहेत. गुजरातेत विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा रेटतांना दिसून येत आहे. काँगे्रसकडे धर्मनिरपेक्ष मतदार आहेत. मात्र एकीकडे काँगे्रसची भारत जोडो यात्रा सुरु असतांना, काँगे्रस गुजरातमध्ये प्रचाराच्या बाबतीत कुठेही दिसून येत नाही. शिवाय काँगे्रसला नवे अध्यक्ष मिळाले असले, तरी खरगे निवडणुकीनंतर माध्यमांत कुठे दिसले नाही. की कोणत्या कार्यक्रमात. शिवाय अध्यक्षांनी कोणतीही रणनीती जाहीर केलेली नाही. काँगे्रसची भारत जोडो यात्रा इतकीय काय, ती आपल्याला दिसते आहे. गुजरातमध्ये आप काँगे्रसची व्होट बँक ताब्यात घेईल, असे बोलले जात आहे. मात्र आप ज्या ठिकाणी निवडणूक लढतो, त्याठिकाणी थेट धडक देण्याची रणनीती आखतो. काँग्रेसची व्होट बँक न फोडता गुजरातेत ते हिंदू व्होट बँकेवर कब्जा करू इच्छित आहेत. या राज्यात 88.57 टक्के हिंदू लोकसंख्या आहे व मुस्लिमांची संख्या 9.67 टक्के आहे. गुजरातेत 27 वर्षांपासून राज्य असलेला भाजप अँटी इन्कम्बन्सीचा सामना करीत आहे. त्यांच्या या रणनीतीचे समर्थन करताना आपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, अल्पसंख्याकांची शंभर टक्के मते घेण्यापेक्षा बहुसंख्याकांची 15 ते 20 टक्के मते घेणे चांगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आप भाजपसमोर कडवे आव्हान देण्याची शक्यता निर्माण होत आहे.
COMMENTS