Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

सातारा / प्रतिनिधी : सातारा ते किन्हई रस्त्यावरील जरंडेश्‍वर येथे झालेले भुयारी मार्गाचे काम अत्यंत चुकीचे झाले आहे. गेले सहा महिने काम चालू अस

बेकायदेशीर सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल
क्रांतिकारकांनी जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही : आ. जयंत पाटील
परजिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी पशुधनाच्या लसीकरणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : सातारा ते किन्हई रस्त्यावरील जरंडेश्‍वर येथे झालेले भुयारी मार्गाचे काम अत्यंत चुकीचे झाले आहे. गेले सहा महिने काम चालू असूनही आजपर्यंत योग्य पध्दतीने काम झाले नसून मार्गात चिखल व दगडगोटे साचल्याने प्रवाशांना अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. तसेच सगळी वाहतूक शिवथरमार्गे वळवली आहे. परिणामी इंधन व वेळेचा अपव्यय होत आहे. या सगळ्या कारभाराला रेल्वेचा बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत प्रवासी संघटनेने रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
पुणे-मिरज दक्षिणमध्य रेल्वेच्या मुख्य रस्त्यावर जरंडेश्‍वर येथे रेल्वेचे स्वयंचलित गेट होते. मात्र, रेल्वेचा दुहेरी मार्ग झाल्याने हे गेट बंद केले व तेथे भुयारी मार्ग तयार केला गेला. मात्र, हा मार्ग अत्यंत चुकीच्या पध्दतीने झाल्याने पावसाचे पाणी खोलगट भागात थांबून वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. पूर्वेच्या बाजूला एकदम चढ आहे, तर पश्‍चिमेला वडूथच्या दिशेने तीव्र उतार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी व गाळ भुयारी मार्गात साठला आहे. हे काम चालू असताना भारत फोर्ज कंपनीच्याजवळ रस्त्याची खोदाई झाली. संबंधित कंपनीने हरकत घेतल्याने काही काळ काम थांबले होते. नंतरच्या काळात सततचा पाऊस झाल्याने कामाला गती मिळाली नाही.
पुलाखाली पाणी साचून राहत असल्याने चारचाकी व दुचाकी वाहने मध्यंतरीच्या काळात धोका पत्करून ये-जा करत होती. रेल्वे प्रशासनाने त्वरित संबंधित भुयारी मार्ग शास्त्रीय पध्दतीने सुरू करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे.

COMMENTS