Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटकांची मालवणमध्ये गर्दी

सिंधुदुर्ग : दिवाळी सुट्टी आणि त्याचसोबत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मालवण शहरात पर्यटकांची रीघ लागली आहे. सिधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आल

Nana Patole : अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले | LOKNews24
राजकारणातील उलटफेर
युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांना 5 लाखाचा सेवादीप पुरस्कार

सिंधुदुर्ग : दिवाळी सुट्टी आणि त्याचसोबत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मालवण शहरात पर्यटकांची रीघ लागली आहे. सिधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बंदर जेटीचा परिसर फुलून गेला आहे. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मालवण शहरात वाहतुकीची कोंडी होण्याचं प्रमाण देखील वाढले होते.
मालवणचा पर्यटन हंगाम जोरात सुरु झाला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मालवणकडे वळले आहेत. त्यामुळे मालवण शहरातील लॉजिंग हाऊसफुल झाले आहेत. मालवण मधील जलक्रीडा करण्याकरिता पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली होती. मालवण मधील चिवला बीच, रॉक गार्डन या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मालवण येथील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरून गेले आहेत. पर्यटन व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पर्यटकांची जास्त पसंती ही कोकणातील समुद्र किनार्‍याना असल्याने समुद्रातील जलक्रीडांचा आनंद पर्यटक लुटत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायही तेजीत आहे. मालवण येथील चिवला बीच, दांडी बीच तसेच तारकर्ली, देवबाग, या समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. तसेच मालवण मधील सिंधुदुर्ग किल्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. त्याचप्रमाणे हे पर्यटक मासे आणि विविध खाद्यपदार्थांचा देखील आस्वाद घेत आहेत. एकंदरीतच थांबलेला पाऊस आणि पडू लागलेली थंडी यामुळे सध्या मालवण सोबत संपूर्ण सिंधुदुर्गात पर्यटनासाठी उत्तम वातावरण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत आहेत.

COMMENTS