चलनप्रतिमाचे राजकारण

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चलनप्रतिमाचे राजकारण

निवडणुका जवळ आल्या की आश्‍वासनांचा पाऊस पडतो. पण ज्यावेळी आश्‍वासनांवर निवडणूक जिंकता येत नाही, अशी खात्री पटते, तेव्हा धार्मिक मुद्दे पुढे केले जाता

सोशल, सोसेल का?
आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
ग्रामपंचायत निवडणुकीचे कल

निवडणुका जवळ आल्या की आश्‍वासनांचा पाऊस पडतो. पण ज्यावेळी आश्‍वासनांवर निवडणूक जिंकता येत नाही, अशी खात्री पटते, तेव्हा धार्मिक मुद्दे पुढे केले जातात. गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याकडे सध्या विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्यामुळे, ते गुजरातची निवडणूक धार्मिक मुद्दाद्वारे लढू इच्छितात. त्यामुळेच त्यांनी चलनप्रतिमांचे राजकारण रंगवायला सुरुवात केल्याचे दिसून येते.

भारतीय राजकारणाची नस ज्याला ओळखता येते, तो राजकारणात यशस्वी होतो. राजकारणाची नस म्हणजे काय, तर जनतेला नेमके काय पाहिजे, हे लोकप्रतिनिधीला, नेत्याला ओळखता आले पाहिजे. त्याचप्रकारचे राजकारण आम आदमी पक्षाकडून खेळले जात आहे. दिल्लीमध्ये मोफत वीज, आरोग्य, पाणी देण्याच्या घोषणा केल्यानंतर आप दिल्लीत सत्तेत आले. पंजाबमध्ये वाढता भ्रष्टाचार, व्यसनाने तरूणपिढी बरबाद झालेली, या पार्श्‍वभूमीवर पंजाबच्या जनतेला व्यसनाला आळा घालणारे सरकार हवे होते. त्याचबरोबर रोजगार आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे सरकार हवे होते. आपने ही नस ओळखून त्याचपद्धतीने प्रचार करत, पंजाब राज्य काबीज केले. त्यानंतर आपची नजर आता गुजरात या राज्याकडे आहे. गुजरात राज्य गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असून, उद्योगधंदे आणि विकासाच्या बाबतीत पुढारलेले राज्य आहे. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्दयावर मते मागता येणार नाही, हे केजरीवाल ओळखून आहेत. त्यामुळे गुजरातच्या जनतेला विकासाचे गाजर दाखवण्याऐवजी भावनिक मुद्दा उकरून काढून त्यावर चर्चा सुरु ठेवण्यात केजरीवाल यांना रस दिसतो. त्यामुळेच त्यांनी भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मीचे चित्र हवे, असे वक्तव्य केले. इंडोनेशिया मुस्लिम देश असला तरी त्यांच्या चलनावर श्रीगणेशाचे चित्र आहे. भारतात याला कुणीही विरोध करणार नाही, असे केजरीवालांनी म्हटल्याने पुन्हा नोटांची आणि त्यावरील चित्र अर्थात प्रतिमांची चर्चा सुरु झाली. भारतातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा आहे, अशातला भाग नाही. चीनच्या चलनावर माओ झेडाँग, पाकिस्तानच्या चलनावर मोहम्मद अली जीना आणि भारताच्या चलनावर महात्मा गांधींची प्रतिमा आहे. भारतीय रिझर्व बँकेने आजवर नोटेच्या तीन सीरिज चलनात आणल्या आहेत. लायन कॅपिटल सीरिज 1949, महात्मा गांधी सीरिज 1996 आणि गांधींचीच नवी सीरिज 2016 ला आरबीआयने आणली. कोणार्कचे सूर्यमंदिर आणि हंपीतील कलाकृतीही भारतीय चलनावर पाहायला मिळाल्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश राजे जॉर्ज सहावे यांची प्रतिमा भारतीय चलनावर होती. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ती प्रतिमा बदलण्यात आली. आणि त्याजागी महात्मा गांधी यांची प्रतिमा चलनावर आली. त्यानंतर केजरीवालांनी गुजरात निवडणुकीसाठी चलनप्रतिमांचे राजकारण रंगवायला सुरुवात केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात वाजण्याची शक्यता आहे. त्याआधीच गुजरातचे राजकारण वेग घेतांना दिसून येत आहे. भाजपसमोर यंदा कडवे आव्हान काँगे्रसचे नसून आपचे असल्यामुळे यंदा निवडणुका त्रिशंकु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातच्या जनतेला विकासाचे गाजर दाखवून निवडणूक जिंकू शकत नाही, याची जाणीव केजरीवालांना आहे. त्यामुळे केजरीवालांनी धार्मिक राजकारणांचा सहारा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच त्यांनी चलनप्रतिमांचे राजकारण पुढे आणले आहे. वास्तविक पाहता भारताचा प्रवास हा डिजिटल चलनाकडे सुरु आहे. देशातील बहुसंख्य जनता धनादेशाद्वारे, फोन पे, गुगल पे, स्वाईप करून करून पेमेंट करतांना दिसून येतात. त्यामुळे बहुतांश जनता आता खिशात रोख रक्कम वापतांना दिसून येत नाही. डिजिटल करन्सीच्या युगात चलनावर प्रतिमा छापण्याचे राजकारण कशासाठी असा सवाल उपस्थित होत असला, तरी केजरीवाल गुजरातची निवडणूक धार्मिक मुद्दयावर लढू इच्छितात.

COMMENTS