Homeमहाराष्ट्रशहरं

महिलेला ’आयटम’ म्हणणे विनयभंग : युवकाला दीड वर्षांची शिक्षा

मुंबई / प्रतिनिधी : एका अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणणे मुंबईतील 25 वर्षांच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेला आयमट म्हणणे हा विनयभंग आहे,

विशाळगडावरील अतिक्रमणे महाशिवरात्रीपूर्वी काढणार
विद्यार्थिनींच्या सरंक्षणासाठी सर्व शाळांना मिळणार होमगार्ड
विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर

मुंबई / प्रतिनिधी : एका अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणणे मुंबईतील 25 वर्षांच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेला आयमट म्हणणे हा विनयभंग आहे, असा निर्वाळा देत मुंबई न्यायालयाने या युवकाला दीड वर्षांची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांनी ही शिक्षा सुनावली. ‘आयटम’ म्हणणे लैंगिक दृष्ट्या महिलांचे वस्तुकरण करणारे आहे, त्यामुळे विनयभंगाच्या कलम 354 नुसार तो गुन्हा ठरतो, असे त्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या वर्तणुकींना पायबंद घालणे आणि गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण मुलांचा अपमान करणे आणि त्यांचे वस्तुकरण करणे यासाठी मुले हा शब्द मुलांसाठी वापरतात. मुलींचा विनयभंग करण्याचा हेतू यातून स्पष्ट होतो. अशा गुन्ह्यांना चाप लावणे आवश्यक आहे. रोड रोमिओंच्या वर्तणुकींपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील दोषी तरुण आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. सन 2015 मध्ये ही मुलगी शाळेतून परतत असताना या तरुणाने या मुलीची छेड काढली होती. हा प्रकार सुरू असताना मुलीने 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना कल्पना दिली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच या तरुणाने पळ काढला होता. या मुलीने आणि तिच्या वडिलांनी नंतर पोलिसांत तक्रार दिली.
मुलीच्या आणि या तरुणाची मैत्री होती. पण मुलीच्या पालकांचा या मैत्रीला विरोध होता, त्यातून ही तक्रार दिली, असा बचाव दोषी युवकाच्या वतीने सादर करण्यात आला. पण न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.

COMMENTS