Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार

शासनाची दिरंगाई; दिवाळीनंतर फराळ गोड होणार का?; मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील परवड मग राज्यात काय?पाचगणी / वार्ताहर : दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने

मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू
रविवारी सज्जनगड येथे दासनवमी महोत्सव
पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्ता खुला करण्याची मागणी; रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय; न्याय देण्याची मागणी

शासनाची दिरंगाई; दिवाळीनंतर फराळ गोड होणार का?; मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील परवड मग राज्यात काय?
पाचगणी / वार्ताहर : दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे ठरवले. मात्र, दिवाळीचा मुख्य दिवस येऊनही अजूनही रेशनिंगवर मिळणारे साहित्य दुकानातच पडून आहे. यामुळे दिवाळीचा दिवा, गरिबा घरी फराळाचा आस्वाद शासनाच्या लालफितीत अडकून पडल्याने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याच तालुक्यात अशी स्थिती असेल तर मग राज्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज येत आहे.
शासनाकडून नुसतेच आश्‍वासन देऊन दिवाळीचे रेशनिंगवर मिळणार आनंदाचा शिधा दिवाळी फराळ बनवून झाला तरी अजून गरिबांना मिळाला नाही. बहुतांश ठिकाणी अशीच काहीशी परिस्थिती आहे. लोकांनी दिवाळी साहित्य खरेदी केले जर शासनाने वेळेत हा शिधा दिला असता तर सर्वसमन्यांची दिवाळी साजरी झाली असती. साखर अजून येणे बाकी आहे, इतर साहित्य आले आहे. मग नक्की कधी साहित्य किट मिळणार याकडे सर्वसमन्यांचे लक्ष लागले आहे.
अगोदरच परतीच्या पावसाने शेतकर्‍याची शेतातली उभी पिके पाण्यात गेली आहेत. हातातोंडाशी आलेले वर्षभराचे शेतीतून मिळणार सोन्याचे धन मातीमोल झाले आहे. सोयाबीन सारखे नगदी पिकांच्या माध्यमातून शेतकर्‍याची दिवाळी गोड होणार होती. मात्र, परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सर्वच हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. शासनाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याकरीता रेशनिगवर शीधा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, दिवाळीचा मुख्य दिवस उजाडला तरीही दिवाळी फराळाचा शासनाचा शिधा अजून मिळाला नसल्याने शिधापत्रिका धारकांची दिवाळी दिवा कधी पेटणार. आता दिवाळी झाल्यावर का? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS