Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवप्रेमी प्रेक्षकांनी अनुभवला शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातील थरार

इस्लामपूर / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा भेटीच्या थरारवर सिनेअभिनेते खा. अमोल कोल्हे यांनी ’शिवप्रताप गरुडझेप’ हा मराठी चित्रप

ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना रत्नसिंधू जीवन गौरव पुरस्कार जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 1119 नवीन वीजजोडण्या
थर्माकोल मॅन उद्योजक रामदास माने यांना सातारा भुषण पुरस्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा भेटीच्या थरारवर सिनेअभिनेते खा. अमोल कोल्हे यांनी ’शिवप्रताप गरुडझेप’ हा मराठी चित्रपट निर्माण केला आहे. इस्लामपूर येथील 20 ते 25 हजार शिवप्रेमी प्रेक्षकांनी शहरातील तिन्ही थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटातील थरार अनुभवला. राजांचे धाडस, निडर वृत्ती, समय सूचकता आणि लढवय्या गुणांचे दर्शन या चित्रपटातून झाल्याचे अनेक युवा शिवप्रेमी प्रेक्षकांनी सांगितले. माजी मंत्री आ. जयंत पाटील, प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
इस्लामपूर येथील माणकेश्‍वर, शिव पार्वती व जय हिंद या तिन्ही टॉकीजमध्ये खा. अमोल कोल्हे निर्मित ’शिवप्रताप गरुड’ झेप हा मराठी चित्रपट लागला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक आग्रा भेट, आग्रा दरबारात त्यांना जाणीवपूर्वक केलेला अवमान, त्यांनी भर दरबारात औरंगजेब बादशहाला दिलेले सडेतोड उत्तर, त्यानंतर त्यांना झालेली अटक आणि या अटकेतून त्यांनी करून घेतलेली सुटका हा सगळा थरार दाखविलेला आहे. हा चित्रपट पाहताना अक्षरशः अंगावर शहारे उभा राहतात. स्वाभिमानाने मुठी अवळताना अनेक वेळा ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या आरोळ्या संपूर्ण थिएटरमध्ये गुंजत राहतात.
माजी मंत्री आ. जयंत पाटील, प्रतिक पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या दोन्ही शहरासह वाळवा तालुक्यातील शिव प्रेमी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता यावा, अशी व्यवस्था केली होती. इस्लामपूर शहरातील माणकेश्‍वर, शिव पार्वती आणि जय हिंद या तिन्ही थिएटरचे चार-चार दिवस सर्व खेळांचे बुकिंग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रवेश पत्रिकेचे वितरण केले होते. पहिल्या दिवशी इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या बॅनरचे पूजन करून मोठ्या उत्साहात थिएटरमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहराध्यक्ष रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील, अलका शहा, प्रतिभा पाटील, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, सचिन कोळी, स्वरूप मोरे, आष्ट्याचे विराज शिंदे, शिवाजी चोरमुले, नेताजी पाटील, राजाराम जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.

COMMENTS