यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट

मुंबई, पुण्यातून मान्सून माघारीस विलंब

मुंबई प्रतिनिधी:- राज्यात ऑक्टोबर महिना म्हणजे ऑक्टोंबर हिटचा महिना म्हणून ओळखला जातो. तापमान वाढते, वीजेचा वापर वाढतो, पिके जोमात वाढतात. मात्र यंद

राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
तुकडे बंदीचा फटका सर्वसामान्यांना; शासनाने फेरविचार करण्याची गरज

मुंबई प्रतिनिधी:- राज्यात ऑक्टोबर महिना म्हणजे ऑक्टोंबर हिटचा महिना म्हणून ओळखला जातो. तापमान वाढते, वीजेचा वापर वाढतो, पिके जोमात वाढतात. मात्र यंदा सर्व गणित बदलल्याचे दिसून येत आहे. परतीचा मान्सून धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा धुमाकूळ असाच बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट दिसून येत आहे.
मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य भारतातील उर्वरित भागांमधून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पश्‍चिममध्य आणि लगतच्या नैऋत्य बाजूस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे परिवलन आहे. तसेच कर्नाटक किनार्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ परिवलन आहे. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे मुंबईतून मान्सून माघारीला आणखी काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्याच्या किनार्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किमीवर चक्रीवादळाचे परिवलन आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

27 लाख हेक्टरवरील पिके बाधित
राज्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे 27 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यातच सोयाबीन आणि बाजरी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. काही भागात भाताच्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सोयाबीनच्या पेरणीने आजवरचे उच्चांक मोडीत काढत 48 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणीही सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे शेंगातून कोंब फुटण्याची स्थिती काही भागात आहे.

COMMENTS