कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहत परिसरातून शहर पोलिसांच्या पथकाने तब्बल 8 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या वेगवेग
कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहत परिसरातून शहर पोलिसांच्या पथकाने तब्बल 8 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तब्बल 13 दुचाकीसह 3 आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, रविवार 9 ऑक्टोबर 2022 रोजी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर व औद्योगिक वसाहत येथे चोरीची मोटार सायकल बुलेट विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक देसले यांना मिळाल्याने त्यांनी तत्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल पुंड, पोलीस कॉन्स्टेबल तमनर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुर्हाडे यांचे पथक नेमून योग्य ते मार्गदर्शन करत कारवाई करण्याचे आदेश दिले असता सदर पोलिस पथकातील कर्मचारी शहर पोलीस ठाणे हद्दीतील माहिती मिळालेल्या औद्योगिक वसाहत परिसरात सापळा लावून बसले असतांना त्या क्षणी दोन अज्ञात इसम हे विना नंबरच्या बुलेट मोटरसायकल वरून संशयितरित्या वेगात जाताना दिसल्याने पोलिस पथकाने तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यातील एकाने आपले नाव किशोर साहेबराव कापसे (वय 21 वर्षे) व दुसर्याने सचिन अंबादास कापसे (वय 20 वर्ष) सांगत राहणार तागडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक असे पोलिसांना सांगितले असता पोलीसांनी त्यांच्याकडील विना क्रमांकाच्या बुलेट मोटर सायकलच्या कागदपत्रा बाबत विचारपूस करताच त्यांनी पोलिसानी उडवा उडवी चे उत्तरे देयला सुरुवात केली असता पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्या दोघांनी दिली त्यांचा तिसरा साथीदार चेतन रमण कापसे वय 19 याच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या तब्बल 8 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी काढून दिल्या असून त्या कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरीही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या सह पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंड, पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुर्हाडे यांनी केली आहे.
COMMENTS