Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वरवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील महाबळेश्‍वरवाडी गावच्या हद्दीत गाढवेवस्ती येथील ओढ्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर म्हसवड पोलिस

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध
सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी
औंधच्या श्री यमाई देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील महाबळेश्‍वरवाडी गावच्या हद्दीत गाढवेवस्ती येथील ओढ्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर म्हसवड पोलिसांनी पकडला आहे. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील महाबळेश्‍वरवाडी हद्दीतील गाढवेवस्ती जवळील ओढ्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सुचना पथकाला दिली. बुधवार, दि. 5 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 2 वाजणेच्या सुमारास पथकाने महाबळेश्‍वरवाडी येथील गाढवेवस्ती जवळील ओढ्यात अवैधरित्या वाळूने भरलेला व नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. बिगर परवाना अवैध वाळचे उत्खनन करून चोरटी वाळू घेऊन वाहतूक करताना पाऊन ब्रास वाळू 4500 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुरज काकडे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक हणमंत मारूती चव्हाण (वय 40, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस. एस. सानप करत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे पोलीस हवालदार सुरज काकडे, पोलीस नाईक एस. एस. नाईक यांनी केली आहे.

COMMENTS