Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोंदवले येथील जुगार अड्ड्यावर छापा; 3 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीचे अनुषंगाने मौजे गोंदवले बु।, ता. माण गावच्या हद्दीतील राहुल प्र

ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री
राज्यात जाणीवपूर्वक दंगे करणार्‍यांना सोडणार नाही : ना. शंभूराज देसाई
प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा टोला

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीचे अनुषंगाने मौजे गोंदवले बु।, ता. माण गावच्या हद्दीतील राहुल प्रकाश रणपिसे (रा. गोंदवले बु।) यांच्या राहत्या घरात काही इसम तीन पानी पत्त्याच्या पानावर पैजेवर पैसे लावून जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी सपोनि अक्षय सोनावणे, पोलीस स्टाफ, दोन पंचासह छापा टाकला. छाप्यादरम्यान अनिकेत गुलाबराव यादव (वय 33), शिवाजी रामचंद्र सोनावणे (वय 57), विशाल रामचंद्र रणपिसे (वय 35), हेमंत सुभाष पवार (वय 35), दादा नाना कट्टे (वय 53), मधुकर गोविंद सोनवणे (वय 60), रामचंद्र आनंदा अवघडे (वय 44), दत्तात्रय अशोक रणपिसे (वय 42), शिवाजी संभाजी रणपिसे (वय 63, सर्व रा. गोंदवले बु।, ता. माण) असे मिळून आले. जुगार खेळत असल्याने त्या ठिकाणी पत्त्यांची पाने, रोख रक्कम 16,240 रूपये, 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल हॅण्डसेट, दीड लाख रुपयच्या चार मोटर सायकली असे सुमारे 3, 58, 240 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
जुगार अड्डाचालक राहुल प्रकाश रणपिसे, चित्रसेन शिवाजी मुके (सर्व रा. गोंदवले बु।, ता. माण) यांच्या विरूध्द दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जी. एम. दोलताडे करत आहेत.

COMMENTS