Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील

कराड / प्रतिनिधी : स्वस्त धान्य दुकानदारीत आता परवडत नाही. अनेक वर्ष काम करत आहोत. महाराष्ट्र संघटनेने ठोस निर्णय घ्यावा. दसरा-दिवाळी तोंडावर आली आहे

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

कराड / प्रतिनिधी : स्वस्त धान्य दुकानदारीत आता परवडत नाही. अनेक वर्ष काम करत आहोत. महाराष्ट्र संघटनेने ठोस निर्णय घ्यावा. दसरा-दिवाळी तोंडावर आली आहे. तेंव्हा ग्राहकांना अडचण निर्माण होवू नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ज्या समस्या आहेत. त्याबाबत कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे त्यामुळे येत्या 10 ऑक्टोंबरला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली.
कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराची बैठक कराड येथील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा संघटक संजय शेटे, कार्याध्यक्ष शिवाजी फाळके, सदस्य दादासो चव्हाण, सचिन इनामदार, कराड उत्तरचे अध्यक्ष संभाजी इंगवले, कराड दक्षिणचे अध्यक्ष सुरेश पाटील, कराड शहरचे किरण देसाई, उपाध्यक्ष रमेश मोहिते, प्रमोद नलवडे आदी उपस्थित होते.

COMMENTS