नंदुरबार प्रतिनिधी- नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या वरती असलेल्या
नंदुरबार प्रतिनिधी– नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या वरती असलेल्या केळी, केवडीपाडा गावा दरम्यान जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना या ठिकाणी पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. दरम्यान केळी येथील रहिवासी रतुबाई जयराम गावित (वय ६०) या केळीहून केवडीपाडा गावात येत असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आक्रोश व्यक्त करत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याचा आरोप केला आहे. संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
COMMENTS