भावना घाणेकर यांच्या गाडीवर उरण येथे अज्ञात गुंडाचा हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावना घाणेकर यांच्या गाडीवर उरण येथे अज्ञात गुंडाचा हल्ला

गाडीवर दगडाने हल्ला करून हल्लेखोर पसार

नवी मुंबई : महाराष्ट्र महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भावना घाणेकर(Bhavana Ghanekar) यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. र

सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये ः अजित पवार
निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज
तंत्रशिक्षणाबरोबर व्यवस्थापन शिक्षणात देखील आरआयटी अग्रेसर : डॉ. सुषमा कुलकर्णी

नवी मुंबई : महाराष्ट्र महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भावना घाणेकर(Bhavana Ghanekar) यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. राजकीय वादातून सदर घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर हल्लेखोर मागून पाठलाग करून आले आणि गाडीवर दगडाने हल्ला करून तेथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशीस सुरुवात केली आहे. सुदैवाने सदर घटनेत कोणतीही दुखापत नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS